चंद्रपूरातील बसस्‍थानक वाहनतळाच्‍या सिमेंटीकरणासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. निधी मंजूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

127

चंद्रपूरातील बसस्‍थानक वाहनतळाच्‍या सिमेंटीकरणासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. निधी मंजूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

Chandrapur चंद्रपूर, दि. 5 : शहरातील मुख्‍य बस स्‍थानकाच्‍या वाहनतळास सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. इतका निधी मंजूर झाला असून राज्‍याचे वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या स्‍थापत्‍य अभियांत्रीकी विभागाचे उपमहाव्‍यवस्‍थापक यांनी दिनांक ३१ ऑक्‍टोंबर २०२२ च्‍या पत्रान्‍वये सदर रकमेच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता दिली आहे. चंद्रपूर शहरातील मुख्‍य बसस्‍थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर शहरातील बसस्‍थानकाच्‍या आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे कामासाठी १६ कोटी रू. निधी सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर करण्‍यात आला. या बस स्‍थानकाच्‍या वाहनतळाचे सिमेंटीकरणासाठी निधी मंजूरीच्‍या प्रस्‍तावाचा त्‍यांनी प्रयत्‍नपूर्वक पाठपुरावा करून यासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. निधी मंजूर केला आहे.सदर बसस्‍थानक लवकरच प्रवाश्‍यांच्‍या सेवेत रूजु होईल असा विश्‍वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here