
घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्या आमदार डॉ.देवराव होळी ची मागणी

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट
शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची केली
महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने व्यक्त केली खंत
गडचिरोली :- घरकुल धारकांना शासन निर्णयाप्रमाणे ५ ब्रास रेती मोफत देण्यासंदर्भात शासन निर्णय असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे आपण याकडे जातीने लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल धारकांना मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी अशी विनंती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना . देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रेती मुबलक प्रमाणात आहे मात्र या जिल्ह्याची रेती बाहेर जिल्ह्यात तस्करी करून विकल्या जाते. परंतु जिल्ह्यातील घरकुल धारकांना शासन निर्णय असताना देखील रेती उपलब्ध करून दिली जात नाही ही मोठी खंत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल धारकांना ५ ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.