
ग्रामीण भारताची मुस्कटदाबी करणारा अर्थसंकल्प : भाई रामदास जराते

A budget that will make rural India smile: Bhai Ramdas Zarate
गडचिरोली : ग्रामीण भारतातील सामान्य माणसासाठी रोजगाराचे माध्यम असलेल्या मनरेगा योजनेवरील ३० टक्के बजेट कमी करुन रोजगाराची वासलात लावण्याचे काम झाले आहे. खत खरेदी अनुदान २० टक्क्यांनी कमी करुन शेतकऱ्यांची मोठी कोंडी मोदी सरकारने केली असून त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर होवून शेतकरी नागवल्या जाणार आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिकेतील शेवटचा अर्थसंकल्प देशातील शेतकरी, मजूर, कामगारांना हवालदिल करणारा ठरला आहे.
शिक्षणासाठीचं बजेट घटवून २.६४ टक्क्यांवरून २.५ करणे दुर्दैवी आहे. मागासवर्गीयांची मुले शिकू नयेत यासाठीच्या मनूवादी विचारांची अंमलबजावणी करणारी ही बाब आहे. आरोग्यवरचाही बजेट २.२ टक्क्यांवरून १.९८ करणे हे मोदी सरकार भांडवलदार धार्जिणे असल्याचे आणि ग्रामीण भारताशी सोयरसुतक नसल्याचे दाखवून देणाऱ्या या अर्थसंकल्पाचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली आहे.