ग्रामसेवक गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू MLA dr.dewarao holi आमदार डॉक्टर देवरावजी होळी

90

ग्रामसेवक गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू mla dr.dewarao holi आमदार डॉक्टर देवरावजी होळी

 

चामोर्शी पंचायत समिती येथे ग्रामसेवकांची घेतली बैठक

ग्रामसेवकांनी ग्राम विकासाच्या संदर्भात दर महिन्याला सर्व विभागांच्या लोकांशी बैठक आयोजित करावी

गडचिरोली:- chamorshi-gadchiroli ज्याप्रमाणे राज्याचे मुख्य सचिव हे संपूर्ण राज्याच्या विकासाच्या संदर्भात सर्व विभागांशी समन्वय साधून कामकाज पार पाडत असतात त्याचप्रमाणे ग्रामसेवक हा राज्याच्या मुख्य सचिवाप्रमाणे गावाचा मुख्यसचिव असून तो गाव विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी सातत्याने काम केले पाहिजे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी पंचायत समिती येथील ग्रामसेवकांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना केले .यावेळी बैठकीला संवर्ग विकास अधिकारी श्री पाटील साहेब प्रामुख्यानं उपस्थित होते.ग्रामसेवकांनी “आमचा गाव आमचा विकास ” ह्यातून गाव विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात २ महिन्यातून किमान एकदा सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करावे. गाव विकासाच्या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास गाव विकास होण्यास मदत होईल . “आमचा गाव आमचा विकास” “आत्मनिर्भर शेतकरी” “आत्मनिर्भर भारत” हे लक्ष ठेवून ग्रामसेवकांनी काम करावे असे आवाहन त्यांनी या बैठकीला उपस्थित ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here