ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022 

63

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022

 

गडचिरोली,(Gadchiroli)दि.16: सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश दिनांक 09 नोव्हेंबर 2022 अन्वये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यामध्ये अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत वांगेपल्ली, वट्रा खुर्द व किष्टापुर दौड, इत्यादी समाविष्ट आहेत आणि प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक- 18/11/2022 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी) दिनांक 28/11/2022 (सोमवार) ते दिनांक 02/12/2022 (शुक्रवार) वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी) – दिनांक 05/12/2022 (सोमवार) वेळ स.11.00 वा.पासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी)- दिनांक 07/12/2022 (बुधवार) वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ- दिनांक 07/12/2022 (बुधवार )दुपारी 3.00 वाजता नंतर. मतदानाचा दिनांक 18/12/2022 (रविवार) स.7.30 वा.पासून ते दुपारी 3.00 वा.पर्यंत

मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार निश्चित करण्यात येईल – दिनांक 20/12/2022 (मंगळवार).

अहेरी तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक 09 नोव्हेंबर 2022 चे पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागु राहील. संभाव्य उमेदवारांना साप्टवेअर द्वारेच नामनिर्देश्नपत्र व घोषणापत्र भरणे अनिवार्य असल्यामुळे http://panchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. या करीता अहेरी तालुक्यातील महाऑनलाईन सुविधा केंद्रात नामनिर्देशपत्रे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामध्ये उमेदवारांनी स्वत:ची नोंदणी करुन घ्यावी व नामनिर्देशनपत्राची, घोषणापत्राची माहिती भरुन त्याचे प्रिंट आऊट काढावे व त्यावर स्वाक्षरी/ अंगठा करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे.

उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी नामनिर्देशपत्र, मत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे घोषणापत्र, आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती, तसेच राखीव जागेकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व निवडूण आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील असे हमीपत्र) इत्यादी कागदपत्रे सादर करावी. नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाच्या घोषणापत्रातील कोणत्याही रकान्याची माहिती कोरी न ठेवता संपूर्ण रकान्याची माहिती भरणेत यावी. ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या उमेदवारांने करावयाच्या खर्चाची सुधारीत मर्यादा सदस्य संख्या 7 ते 9 करिता 25,000/- रूपये, 11 ते 13 सदस्य संख्या करीता 35,000/- रूपये व 15 ते 17 सदस्य संख्या करीता 50,000/- आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवारांने करावयाच्या खर्चाची सुधारीत मर्यादा सदस्य संख्या 7 ते 9 करिता 50,000/- रूपये, 11 ते 13 सदस्य संख्या करीता 1,00,000/- रूपये व 15 ते 17 सदस्य संख्या करीता 1,75,000/- आहे. नामनिर्देशन पत्रासोबत अनु.जाती किंवा अनु. जमाती यांच्यासाठी राखीव जागेकरीता रूपये 100 (अक्षरी-रूपये शंभर फक्त) व सर्वसाधारण जागेकरीता रूपये 500 (अक्षरी- रूपये पाचशे फक्त ) एवढी अनामत रक्कम रोखीने भरणे अनिवार्य आहे.

ग्रामपंचायत वांगेपल्ली, वट्रा खुर्द व किष्टापुर दौड. येथिल सदस्य पद / थेट सरपंच पदाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवार दुस-या प्रभागातील मतदार असल्यास त्याबाबतचा उत्तारा सोबत जोडणे आवश्यक आहे.

नामनिर्देशनपत्रासोबत अपत्याबाबतचे घोषणापत्र व शौच्छालयाचा वापर करीत असल्याबाबत सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र जोडावे. असे तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार, अहेरी ओंकार शेखर ओतारी यांनी कळविले आहे.

****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here