ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022

103

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022

 

गडचिरोली,( Gadchiroli elections grampanchayatit )दि.10: सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश अन्वये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2022 पुढीलप्रमाणे गडचिरोली *जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीकरिता* (सदस्य पदांसह थेट सरपंच) संगणकप्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे.

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक- 18/11/2022 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी ) दिनांक 28/11/2022 (सोमवार) ते दिनांक 02/12/2022 ( शुक्रवार) वेळ सकाळी ११.०० ते दु.3.००., नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) – दिनांक 05/12/2022 (सोमवार) वेळ स.११.०० वा.पासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी)- दिनांक 07/12/2022 (बुधवार) दुपारी ३.०० वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ- दिनांक 07/12/२०22 (बुधवार )दुपारी ३.०० वाजता नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक 18/12/२०22 (रविवार) (गडचिरोली जिल्हयासांठी स.७.३० वा.पासून ते दुपारी.३.०० वा.पर्यंत)

मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील).- दिनांक 20/12/२०22 (मंगळवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक- दिनांक 23/12/2022 (शुक्रवार) पर्यंत

तरी वरीलप्रमाणे निवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचेकडून याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here