गोविंदपूर गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एका महीलेचा मृत्यु

287

गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर येथे गावालगत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माया धर्माजी सातपुते (५५) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना आज शुक्रवारी दुपारी १२:३० ते १:०० वाजताच्या सुमारास घडली.असुन सदर घटनेची माहिती गडचिरोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून वनविभागाची टीम रवाना झाली आहे.या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. उल्लेखनीय आहे की मुडझा, वाकडी, मसली, विहीरगाव पूढे तळोधीपर्यंत पाच ते सहा वाघांचा वावर असल्याची माहिती आहे. मसली, गुरवळा, शिवणी ते गोविंदपूर च्या पुढे वाघ भ्रमंती करताना आढळून आले आहेत. तीन वर्षांपूर्वी मसली- गुरवळा परिसरात एका वाघिणीने तीन शावकांना जन्म दिला होता. ते आता तीन वर्षांचे झाले असून स्वतःचे क्षेत्र विकसित करीत आहेत. परिणामी गोविंदपूर – तळोधीपर्यंत या वाघांचे अस्तित्व आहे. वनविभागाने नागरिकांना जंगलात एकटे  जाऊ नये असे आवाहन केले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here