गोंडवाना विद्यापीठातर्फे अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांना सुरुवात

116

गोंडवाना विद्यापीठातर्फे अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांना सुरुवात

 

गडचिरोली,(,Gadchiroli-Gondwana university)दि:६

गोंडवाना विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांना नुकतीच सुरुवात झाली आहे.या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील संघ सहभागी होणार आहेत. या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये आर्चरी, स्विमिंग ,मल्लखांब, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कबड्डी, हॉकी, क्रिकेट, हँडबॉल, मिनी गोल्फ या आणि इतर स्पर्धांचा समावेश आहे.

 

या स्पर्धांना योगासन स्पर्धेपासून सुरुवात झाली असून योगासन स्पर्धेचे प्रमुख संतोष शर्मा यांनी योगासन स्पर्धेचे संयोजन केले आहे. संघ निवडीसाठी डॉ. महेश जोशी आणि संघपाल नारनावरे यांनी सहकार्य केले . भारतीय आंतरविद्यापीठ आणि पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या स्पर्धांमध्ये उतरलेल्या विविध महाविद्यालयांमधून विद्यापीठाचा संघ तयार होणार आहे.

 

स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे ,प्र-कुलगुरू ,डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संचालक शारीरिक क्रीडा विभाग डॉ. अनिता लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here