गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन परिसराचा कोनशीला समारंभ आणि दहावा दीक्षान्त समारंभ,राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती

158

गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन परिसराचा कोनशीला समारंभ आणि दहावा दीक्षान्त समारंभ,राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती

३९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके; १३७ आचार्य पदवी

Gadchiroli gondwana university गडचिरोली(गोवि)दि.३ :

गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ बुधवार दि. ५ जुलै, २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे तसेच अडप्पली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन परिसराचा कोनशीला समारंभ श्रीमती द्रौपदी मुर्मू महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणुन श्रीमती द्रौपदी मुर्मू महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार हया दीक्षांत भाषण करतील. रमेश बैस, मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य तथा मा. कुलपती, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या समारंभात विशेष अतिथी म्हणुन एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, नितीन गडकरी मा. मंत्री रस्ते वाहतुक व महामार्ग भारत सरकार, हंसराज अहिर मा.राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष , देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, अजित पवार ,मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, आदी उपस्थित राहणार असुन श्री. चंद्रकांतदादा पाटील मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री, वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य,धर्मराव बाबा आत्राम मा. मंत्री, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. प्रशांत बोकारे व प्र- कुलगुरु मा. डॉ. श्रीराम कावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे

गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित नवीन परिसराचा कोनशीला समारंभ अडप्पली येथे होणार असून १७७ एकरात पसरलेले हे नवीन विद्यापीठ परिसर प्रगती ,नाविन्य आणि अमर्याद शक्यतांचे प्रतिक आहे .

२०२५ – २६ पर्यंत १७७ एकर जागेवर अडप्पली येथे नवीन विद्यापीठ परिसराचा विकास करण्याचा मानस आहे .

समारंभात एकूण गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी २७८, प्रथम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी ६२, सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी ३९, तर आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३७ आहे. यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा ४५, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ८, मानव विज्ञान विद्याशाखा ५४, आंतर विज्ञान विद्याशाखा ३० इतक्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठात पदवी प्राप्त विद्यार्थी तब्बल २० हजार ५३५ आहेत. यात पदवी चे १५२३० , पदव्युत्तर ५३०५ विद्यार्थी आहेत.          *विद्यापीठाचे भविष्यातील प्रयत्न*

२०३० पर्यंत विद्यापीठ क्षेत्राचे उच्च शिक्षणातील सकल नोंदीचे प्रमाण १४ % वरून २० %पर्यंत वाढविणे .

२०२३ सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करणे.

गोंडवाना विद्यापीठाला “आदिवासी आणि वन” विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणे.

२०२५-२६ पर्यंत १८० एकर जागेवर पसरलेल्या अडपल्ली येथे नवीन कॅम्पसचा विकास करणे,

कल्पना केलेल्या भौतिक पायाभूत सुविधा त्यात प्रशासकीय इमारत, शैक्षणिक ब्लॉक वर्टिकल, युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च, ट्रायसेफ इनक्युबेशन सेंटर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, हेल्थ सेंटर, ऑफिसर निवास, अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचारी निवासस्थान नियोजीत करणे.

2030 पर्यंत 10,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे,

2030 पर्यंत अडपल्ली कॅम्पसमध्ये 10,000 विद्यार्थ्यांसाठी मेगा हॉस्टेल आणि मेगा कॉमन मेस तयार करणे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here