गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीचा मार्ग मोकळा

121

गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीचा मार्ग मोकळा

 

गडचिरोली (Gadchiroli)दि:८

बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली विद्यापीठाची भूसंपादनाची प्रक्रिया मार्गी लागलेली आहे.६४.८० हे. आर जमिनीची खरेदी दिनांक ७डिसेंबर २२ ला सुरू झाली. या तारखेला एक खरेदी खत झालेला असून दिनांक ८ डिसेंबर २०२२ ला सहा शेतकऱ्यांचे खरेदीखत झालेले आहे .विद्यापीठाच्या २०८ एकर जमीनीपैकी ३५ एकर जमीनीची थेट खरेदी झालेली होती. त्यातील १५ एकर शासकीय जमीन प्राप्त झालेली होती. उर्वरित ६४.८० हेक्टर आर जमिनीची खरेदी ७ डिसेंबर पासून सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी संजय मीना आणि कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आलेले आहे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली भूसंपादनाची प्रक्रिया मार्गी लागली असून विद्यापीठाचे कुलगुरू यांनी मागील एका वर्षाच्या कालावधीत अविरत प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नात शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी सकारात्मक सहभाग दर्शविला. विद्यापीठाच्या विकासाला आवश्यक असणारी महत्त्वाची बाब म्हणजे जमीन आहे. त्यामुळे विद्यापीठ विकासाचा मार्ग मोकळा झालाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here