गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

90

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

गडचिरोली दि. ४- गोंडवाना विद्यापीठाकडून गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यात विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) च्या प्राचार्य ,शिक्षक व पदवीधर अशा तीन गटातून 33 जागासाठी ८८ उमेदवार रिंगणात होते.

 

मतदान शांततेत पार पडले असून सकाळी 8 वाजेपासून 5 वाजेपर्यंत शहरी व तालुका मुख्यालय भागात मतदान सुरू झाले तर अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग असलेल्या भागात सकाळी 7 वाजेपासून 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. गडचिरोली जिल्हाकरीता १८ आणि चंद्रपूर जिल्ह्याकरीता ३६ अशा एकुण ५४ मतदान केंद्रावर मतदान शांतेत पार पडले.

शिक्षक मतदार संघातून 10 प्रतिनिधी निवडून द्यायचे होते. त्यासाठी 42 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले . खुल्या गटातून ५ उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यासाठी २१उमेदवार उभे आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त व भटक्या जमाती ,इतर मागास वर्ग व महिला यातून प्रत्येकी एक उमेदवार असे ५ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी ही ४प्रवर्गातून प्रत्येकी ४ उमेदवार आणि महिला प्रवर्गातून १जागा त्यासाठी ५ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.यासाठी ९०४ मतदार संख्या होती.

 

विद्यापरीषदे मधून विज्ञान व तंत्रज्ञान, मानवविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरविद्याशाखा यातून प्रत्येकी दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. आंतरविद्याशाखेसाठी सर्वच उमेदवारी अर्ज अपात्र ठरले. उर्वरित तीन शाखामधील राखीव गटातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर खुल्या गटातून विज्ञान व तंत्रज्ञान मधून ३,मानवविद्या शाखेतून ४, वाणिज्य व व्यवस्थापन मधून २ उमेदवार रिंगणात आहेत.

 

प्राचार्य गटासाठी ४३ मतदार होते यात ९५%, महाविद्यालय अध्यापक ९०४-७८.५३% पदवीधर २३६२४-४७.१६%,विद्यापरीषद ८६३ , ८६.६७%, अभ्यासमंडळ१६४ – ८३% , असे एकुण २५५९८ मतदार आणि त्यांची अंदाजीत टक्केवारी आहे.

 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016अन्वये विद्यापीठातील विविध प्राधिकरणाच्या २०२२च्या निवडणूका सर्वात प्रथम म्हणजेच

४ सप्टेंबरला घेणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरत ५४ मतदान केंद्रावर निवडणूक शांततेत पार पडली.

३१ऑगस्ट २०२२ ला सर्व प्राधिकरणाचा कार्यकाळ संपलेला आहे आणि विद्यापीठाचे प्रशासन सुव्यवस्थित चालवण्याच्या दृष्टिकोनातून प्राधिकरणाच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. त्यामुळे आज विविध प्राधिकरणाच्या निवडणुका घेण्यात आल्या. ७ आणि ८ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.

 

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, आणि कुलसचिव तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी डॉ. अनिल हिरेखन यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यानी निवडणुकीच्या सफल आयोजनासाठी अविरत परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here