गोंडवाना विद्यापीठाचा ११वा वर्धापन दिन रविवारी विविध पुरस्कारांचे वितरण, परिक्षा भवन लोकार्पण, अतिथीगृह आणि सांस्कृतीक सभागृहाचा भुमीपुजन सोहळाही होणार संपन्न

286

गोंडवाना विद्यापीठाचा ११वा वर्धापन दिन रविवारी विविध पुरस्कारांचे वितरण, परिक्षा भवन लोकार्पण, अतिथीगृह आणि सांस्कृतीक सभागृहाचा भुमीपुजन सोहळाही होणार संपन्न

 

गडचिरोली,(gadchiroli)दि.30: 2 ऑक्टोंबर 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत. 02 ऑक्टोंबर रविवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती तसेच गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमीत्याने जिवन साधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्कारांचे वितरण, परिक्षा भवन लोकार्पण व अतिथी गृह आणि सांस्कृतिक सभागृह तसेच वर्ग 1 नवसंशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदिय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रमुख अतिथी म्हणून वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, पालकमंत्री चंद्रपूर आणि गोंदिया जिल्हा सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशान्त बोकारे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.श्रीराम कावळे उपस्थित राहणार आहेत. परिक्षा भवन लोकार्पण व अतिथी गृह आणि सांस्कृतिक भवन भुमीपुजन सोहळा तसेच वर्ग 1 नवसंशोधन केंद्राचे उद्घाटन यासह विद्यापीठाच्या 2021-22 करीता उत्कृष्ट कार्याबद्दल जिवन साधना गौरव पुरस्कार मोहन हिराबाई हिरालाल चंद्रपूर महाविद्यालय पुरस्कार ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव, तालुका सिंदेवाही,जि.चंद्रपूर, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉ.अमिर ए.धमानी, ग्रामगीता महाविद्यालय चिमुर. जि. चंद्रपूर, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालये) डॉ.श्रीराम गोविंद गहाणे,आदर्श आर्ट्स अॅन्ड कॉमर्स कॉलेज देसाईगंज (वडसा). जि.गडचिरोली आणि डॉ. अपर्णा बापुजी धोटे, निलकंठराव शिंदे सायंस अॅन्ड आर्ट्स कॉलेज भद्रावती, जि.चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ३) कु.मनिषा उत्तमराव फुलकर आणि (वर्ग 4) अनिल भोजा चव्हाण, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालये)प्रमोद नामदेवराव

नागापुरे, आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा जि.चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विशाल मनोहर शेंडे. डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार प्रियंका सोमेश्वर दिघोरे, नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालय ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here