गडचिरोली शहरातील बुथ रचना व शक्ती केंद्र मजबुत करा* जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन गडचिरोलीत भाजप शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक

53

गडचिरोली शहरातील बुथ रचना व शक्ती केंद्र मजबुत करा*
जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन
गडचिरोलीत भाजप शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक

गडचिरोली दि. 22/नोव्हेंबर    gadchiroli :- आगामी निवडणुका व भाजपचे संघटन वाढवण्याचे दृष्टीने गडचिरोली शहरातील शक्ती केंद्र व बुथ रचना मजबूत करणे आवश्यक असून पक्षाकडून तसे निर्देश आलेले आहेत भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे लोकांपर्यन्त पोहोचवून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा मिळेल यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन आपापल्या वार्डातील बुथ रचना मजबूत करण्यावर भर द्यावा एका बुथवर पुरुष व महिला मिळून 30 सदस्य ठेवण्यात यावे, तसेच युवा मोर्चा बुथ कार्यकारीणी मजबूत करून शक्ती केंद्रप्रमुखांनी बुथ रचनेचा आढावा घ्यावा व पक्षाची ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे व आगामी निवडणुका लक्षात घेता आतापासूनच कामाला लागून नागरिकांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्र जी मोदी यांच्या नावे लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदींजी अशा आशयाचे पत्र लिहुन घ्यावे तथा भाजपच्या सर्व आघाड्याची कार्यकारिणी पूर्ण करून सक्रीय कराव्यात असे आवाहन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी गडचिरोली शहराच्या आजच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.*
*याप्रसंगी भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम यांनी पक्षाचे शक्तीकेंद्र व बूथ केंद्राची रचना मजबूत करण्यासंदर्भात व धन्यवाद मोदीजीचे पोस्ट कार्ड नागरिकाकडून स्वीकारण्याबाबत मार्गदर्शन केले. तर गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हा संयोजिका योगिता पिपरे यांनी गडचिरोली शहरातील प्रत्येक वार्डातील केंद्र व राज्य शासनाच्या जीवनावश्यक व लाभदायी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थी नागरिकांकडून धन्यवाद मोदीजींचे पोस्टकार्ड भरून घेऊन ते पक्षाकडे पाठवण्याचे आवाहन केले.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्त्वपूर्ण बैठक आज दि. 22 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीला प्रामुख्याने गडचीरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर जी काटवे महिला आघाडीचे शहराध्यक्ष कविताताई उरकुडे शहराचे महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, तालुक्याचे महामंत्री हेमंत बोरकुटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हर्षल गेडाम भाजपचे ज्येष्ठ नेते चिचघरे काकाजी माजी नगरसेविका वैष्णवी नैताम युवा मोर्चाचे राजू शेरकी, गडचिरोली शहर दलित आघाडीचे शहर अध्यक्ष प्राध्यापक उराडे सर विलास नैताम देवाजी लाटकर रश्मी बाणमारे भावना हजारे पूनम हेमके व भाजप गडचिरोली शहराचे पदाधिकारी व महिला सदस्य उपस्थित होत्या.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here