
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन

Gadcgiroli :- गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावोगावी, खेडापाड्यात विकास कामे सुरू झालेली असून आता हा विकासाचा झंजावात असाच सुरू राहील असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे MLA Dr.Devarao आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील मक्केपली व मछली येथील रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
यावेळी उपस्थित मक्केपली चे सरपंच आदित्यजी कांदो, मछलीच्या सरपंच सौ. रेखाताई कोहपरे, उपसरपंच मनोज येलमुले, श्री. कोमेरवार, श्री. केशव खोब्रागडे, चामोर्शी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. दिलीपजी चलाख,बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा , श्री. भास्कर बुरे जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा श्री. साईनाथ बुरांडे तालुका महामंत्री श्री. शेषराव कोहळे उपसरपंच सोनापुर तथा गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गडचिरोली विधानसभा आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांची रस्ते, नाली, सभामंडप, समाजमंदिर, वाचनालय, ग्रंथालय, सौंदर्य करण्याची कामे इत्यादी विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून विधानसभा क्षेत्रात सुरू असलेला हा विकासाचा धंदा झंजावात यापुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला