गडचिरोली येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

52

गडचिरोली येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

गडचिरोली:-आदिवासी परधान समाज मंदिर येथे निस्वार्थ सेवा युवा ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य, बोधीसत्व, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक विरेंद्र रामटेके, विजय उके, अमोल मेश्राम, मानसिंग सुरपाम, रेवनाथ गोवर्धन, बाळू गोवर्धन, आनंद खोब्रागडे, अजय काळे, महेन्द्र मसराम यांच्या हस्ते माल्यार्पण व मेणवात प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत मोलाचे मार्गदर्शन केले.

“एकच साहेब… बाबासाहेब…

या घोषणांनी परिसर दणाणून गेले.

या कार्यक्रमा प्रसंगी अजय सुरपाम, नंदकिशोर कुंभारे,विवेक वाकडे,निखिल वाकडे,राजेश डोंगरे, रोहित आत्राम,आकाश कुळमेथे, विजय सुरपाम,अजय सिडाम, महादेव कांबळे, चक्रधर प्रधान,राज डोंगरे,अनिकेत बांबोळे, साहिल गोवर्धन, साहिल शेडमाके,अंकुश बारसागडे, यश कुळमेथे, अजय, सुरज गेडाम सह इतर नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन रुपेश सलामे यांनी केले तर आभार वैभव रामटेके यांनी मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here