गडचिरोली येथे दिनांक 12 ते 16 डिसेंबर पर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

86

गडचिरोली येथे दिनांक 12 ते 16 डिसेंबर पर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

 

गडचिरोली,(Gadchiroli) दि.07: दिनांक 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत गडचिरोली येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्हयातील कृषि व कृषिपुरक उद्योगांना सहाय्यभुत ठरेल व शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होईल हे उद्दिष्ठ ठेवत या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात आत्मा,माविम व उमेद मार्फत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),कृषि विभाग व सर्व संलग्न विभाग मार्फत बचत गटांचे प्रदर्शन व उत्पादन विक्री देखील ठेवण्यात आलेले आहे.

जिल्हयात कृषि क्षेत्रात काम केलेल्या प्रगतशिल व उदयन्मुख शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे.या अनुषंगाने प्रकल्प संचालक (आत्मा) गडचिरोली यांनी अशा शेतकऱ्यांनी कामाचा तपशिलासह प्रस्ताव सबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन प्रस्ताव सादर करावेत. इच्छुक शेतकरी बांधवाना विनंती आहे की, त्यांनी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.व दिनांक 8 डिसेंबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. तसेच इच्छुक कृषि व कृषि संलग्न उत्पादनाची कृषि पुरक उत्पादकांनी विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल ची नोंदणी प्रकल्प संचालक (आत्मा), गडचिरोली यांचे कार्यालयात दिनांक 09 डिसेंबर 2022 पर्यंत करावी. स्टॉल ची संख्या मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येईल. नोंदणीकरीता स्टॉलसाठीचे शुल्क आत्मा कार्यालय गडचिरोली मार्फत कळविण्यात येईल. स्टॉल आरक्षित करण्याकरीता जयंत टेभुर्णे मो.न.9404023459 वर संपर्क साधावा.

तरी जिल्हयातील जास्तीत जास्त महिला बचत, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व विक्रेता यांनी जिल्हा कृषि महोत्सव 2022 या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here