
गडचिरोली बस स्थानक व आगार येथील सोयी सुविधा व कर्मचाऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

विभाग नियंत्रक वाढीभस्मे यांचे सोबत सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून बैठक
बैठकीत विवीध समस्यांवर चर्चा
Gadchiroli – गडचिरोलीचे बस स्थानक व आगार हे विविध समस्यांनी ग्रस्त असून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावा तसेच येथील कर्मचाऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले असून त्याही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे mla dr.devrao holi आमदार डॉ देवराव जी होळी यांनी सेवा शक्ति संघर्ष कर्मचारी संघाच्या वतीने आयोजित बैठकीत केले.
या बैठकीला विभाग नियंत्रक वाढीभस्मे जी, सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव श्री शैलेश जी पिसे, गडचिरोली जिल्ह्याचे बंडूची पत्तीवार यांचेसह प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीमध्ये गडचिरोली बस आगारामध्ये प्रवाशांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. चालक व वाहकांसाठी रात्रीच्या मुक्कामासाठी विश्रांती गृहाची व्यवस्था करावी. २०१९ मध्ये चालक प्रशिक्षण केंद्रात आदिवासी चालक भरती घेऊन प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांना तीन वर्षापासून त्यांना नियुक्ती आदेश दिलेले नाही त्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे . रोजंदारी तत्त्वावर १८० दिवसापेक्षा जास्त दिवस होऊनही हक्कापासून वंचित असणाऱ्यांना त्यांचे हक्क प्रदान करावे. तिकीट मशीनला लागणाऱ्या रोलची कमतरता पूर्ण करण्यात यावी अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा यासह विविध मागण्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. काही मागण्यांवर लागलीच तोडगाही काढण्यात आला