गडचिरोली पोलीस भरतीत बनावट क्रीडा प्रमाणपत्र,स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु

94

गडचिरोली पोलीस भरतीत बनावट क्रीडा प्रमाणपत्र,स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु

Fake sports certificate in Gadchiroli police recruitment, investigation by local crime branch started

गडचिरोली  gadchiroli  :-  नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल होणे बाकी असतानाच क्रीडा आरक्षणाच्या कोट्यातील उमेदवारांनीही बनायट प्रमाणपत्राच्या माध्यमातून लाभ घेतल्याचे प्रकरण बाहेर आले आहे.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलात चार महिन्यांपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. एकूण ३४८ जागांसाठीच्या या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षण कोट्यातून नियुक्ती मिळवली होती. मात्र, या उमेदवारांचे प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र बनावट निघाले होते.

या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान
पोलिसांना क्रीडा विभागाच्या आरक्षण कोट्यातही बनावट प्रमाणपत्र जोडून काही उमेदवारांनी अवैधपणे नोकरीचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनात या विषयाचा छडा लावण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र देत
नोकरीचा लाभ घेतल्याच्या आरोपावरून दोन नवनियुक्त पोलिसांसह प्रतीक्षेतील एकास अटक झाली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटमधील लोकांचे अटकसत्र राबवले गेले. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत आहेत.

(आता बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन पोलिस दलात भरती झालेले उमेदवारही चौकशीच्या रडारवर आले आहेत. नागपूर येथील एका शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे बनावट प्रमाणपत्र जोडलेल्या सात जणांची चौकशी अंतिम टप्यात आली असून गडचिरोलीतील एक पत्रकार व एक क्रीडा प्रशिक्षकाच्या माध्यमातून दोघांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. पोलिस सूत्रांनी चौकशी सुरू असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here