गडचिरोली पोलीस दल व आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण” अंतर्गत फोटोग्राफी व हाऊस वायरींग प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

165

गडचिरोली पोलीस दल व आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण” अंतर्गत फोटोग्राफी व हाऊस वायरींग प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

फोटोग्राफी 35 व हाऊस वायरींगच्या 35 प्रशिक्षणाथ्र्यांनी घेतले प्रशिक्षण

S bharat network (sp office gadcgiroli)गडचिरोली जिल्ह्रातील शेतक­यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील माओवादग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षीत गरजु बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडाण अंतर्गत व बिओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने इच्छुक युवकांना फोटोग्राफी व हाऊस वायरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सदरचे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्याचा निरोप संमारंभ कार्यक्रम आज दि. 30/07/2024 रोजी आरसेटी, गडचिरोली येथे पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने फोटोग्राफी प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील 35 व वायरींग प्रशिक्षणामध्ये 35 प्रशिक्षणाथ्र्यांनी सहभाग घेतला होता. दिनांक 01/07/2024 ते 30/07/2024 पर्यंत एकुण 30 दिवसाच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणाथ्र्यांना फोटोग्राफी व हाऊस वायरींगचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांना अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन फोटोग्राफी व हाऊस वायरिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणाथ्र्यांना व्यवसाय सुरु करण्याकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता यांनी सांगितले की, कोणत्याही गोष्टीची लहाण्यापासून सुरुवात करुन ती मोठ¬ापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. तसेच कौशल्याचा आधार घेऊन आपल्या स्वत:चा विकास साधता येतो आणि ते गडचिरोली पोलीस दलाने तो कौशल्याचा आधार आपल्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलेला आहे. यासोबतच स्किलींग इन्स्टीट¬ुटच्या माध्यमातून दिल्या जाणा­या बेसीक ट्रेनिंगचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घेऊन त्याद्वारे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करुन पुढे आपला विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले.

सदर निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री. प्रशांत धोंगडे, एलडीएम, बॅक ऑफ इंडीया गडचिरोली, श्री. कैलास बोलगमवार, संचालक आरसेटी, श्री. हेमंत मेश्राम व पुरुषोत्तम कुनघाडकर, कार्यक्रम समन्वयक, आरसेटी गडचिरोली हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here