गडचिरोली पोलीस दलाने २ संशयीत ईसमांकडुन २७ लाख ६२ हजार रु. केले जप्त

258

गडचिरोली पोलीस दलाने २ संशयीत ईसमांकडुन २७ लाख ६२ हजार रु. केले जप्त

Breaking mews

Gadchiroli गडचिरोली – भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर २ हजार रु. च्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिक सध्या २ हजार रु. च्या नोटा बँकेतून बदलून घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर माओवाद्यांनी बेकायदेशीर रित्या जमवलेले पैसे ते लोकांच्या माध्यमातुन वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलवुन घेत आहेत. ब-याच ठिकाणी माओवाद्यांच्या या रक्कमा जप्त केल्या गेल्या आहे. आज दिनांक ०५/०७/२०२३ रोजी दुपारी ०२.०० वा. एका मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकांच्या जवानांची नाकाबंदी अहेरी येथे लावली असता त्याठिकाणी २ संशयीत ईसमाकडुन २७ लाख ६२ हजार रुपयाचे बेकायदेशीर रक्कम मिळुन आली.

 

सविस्तर माहिती अशी की, संशयीत इसम १) नामे रोहीत मंगु कोरसा, वय २४ वर्ष, रा. धोडर ता. एटापल्ली जि. गडचिरोली, २) नामे बिप्लव गितीश सिकदार, वय २४ वर्ष, रा. पानावर जि. कांकेर (छ. ग.) हे दोघे मोटार सायकलने जात असतांना नाकाबंदी दरम्यान विचारपुस केली असता त्यांच्याजवळ २ हजार रु. ६०७ नोटा एकुण रक्कम १२,१४,००० /- रु. ५००रु. ३०७२ नोटा एकुण रक्कम १५, ३६, ०००/- रु. २०० रु. ७ नोटा एकुण रक्कम १४००/- रु. व १०० रु. १०६ नोटा एकुण रक्कम १०,६००/- रु. असे मिळुन २७,६२,००० /- ( सत्ताविस लाख बासष्ट हजार रुपये) त्यांच्या जवळुन मिळुन आले. एवढ्या मोठ्या रक्कमेबाबत विचारपुस केली असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. अधिक विचारपुस केली असता अशी माहिती मिळुन आली की, ही रक्कम भारत सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे असुन त्यातील २ हजार रुपयाच्या नोटा बदलविण्यासाठी दिले गेले आहेत. मिळुन आलेल्या दोन्ही इसमांवर यूएपीए अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

 

यावरुन असे दिसुन येते की, माओवादी जनतेच्या हितासाठी कधीच लढले नाहीत त्यांचा लढा हा फक्त पैशासाठी, सत्ता गाजविण्यासाठी, गरीब आदिवासींची पिळवणुक करण्यासाठीच चालत आला असुन, वेगवेगळ्या ठेकेदारांकडुन खंडणीच्या माध्यमातुन गोळा केलेला पैसा त्यांनी कधीच जनतेच्या विकासासाठी, हितासाठी वापरला नाही. माओवाद्यांनी हा पैसा फक्त भारत सरकार विरुध्द देशविघातक कृत्ये करण्यासाठी व स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. गडचिरोली पोलीस दल सर्व नागरीकांना आवाहन करते की, माओवाद्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडु नका व कोणी बेकायदेशीर २ हजार रु. च्या नोटा बदलविण्यासाठी सांगत असले तर जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमके ला संपर्क करावा.

 

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here