
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती- 2022 ची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहिर

गडचिरोली (Gadchiroli) :- जिल्हा पोलीस शिपाई भरती – 2022 च्या 136 जागांसाठी दिनांक- 19/06/2022 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेनंतर दिनांक 12/07/2022 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती- 2022 ची अंतिम शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी प्रसारीत करण्यात आली होती. शारीरिक चाचणीकरीता 1436 उमेदवार पात्र झाले होते. या सर्व उमेदवारांच्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह ग़्क्क् व इतर कागदपत्रांची तपासणी व शारिरीक मोजमाप करण्यात आले होते. शारीरिक चाचणीकरीता पात्र 1436 उमेदवारांपैकी 1097 उमेदवार शारीरिक चाचणीकरीता हजर होते. तसेच पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी दि. 06/09/2022 ते 08/09/2022 या दरम्यान घेण्यात आली होती. शारीरिक चाचणीची तात्पुरती गुणसूची यादी दिनांक 15/09/2022 रोजी गडचिरोली पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आली होती.
सदरची तात्पुरती प्रवर्गनिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी ही लेखी चाचणी (पेपर क्र. 01 ) व मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकुण गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. याकरीता साप्रवि. शा.नि.क्र. एसआरव्ही 1012/प्र.क्र.16/12/16-अ दिनांक 13/08/2014 व साप्रवि शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकिर्ण 1118/प्र.क्र.39/16-अ दिनांक 19/12/2018 तसेच गृह विभाग शा.नि.क्र. पोलीस – 1819/प्र.क्र. 316/पोल-5 अ दिनांक 10/12/2020 या शासन निर्णयाच्या आधारावर काढण्यात आलेली आहे. सदरची तात्पुरती प्रवर्गनिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी ही उमेदवारांच्या माहीती करीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे या संकेतस्थळावर तसेच लिंकवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या प्रवर्गनिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 24/09/2022 चे 18.00 वा. पर्यत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथिल समाधान कक्ष, यांचे दुरध्वनी क्र. 8806312100 यावर किंवा उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे व्यक्तीगत आक्षेप नोंदवता येईल. दिनांक 24/09/2022 चे 18.00 वा. नंतर प्राप्त होणाया आक्षेपांची नोंद घेण्यात येणार नाही.
उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, यांचे दुरध्वनी क्र. 8806312100 यावर तसेच उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे संपर्क साधावा.