
गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने भाजप सरकारचा निषेध

गडचिरोली: गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून केंद्रातील भाजप सरकार च्या हुकुमशाही धोरणाचा आणि काँग्रेस नेते राहुल गांधीजी यांची सुडबुद्धीने खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समूह आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध यावर संसदेत प्रश्न विचारले असताना त्यांच्या आवाज दडपण्याकरिता 2019 मधील खोट्या प्रकरणात अडकवण्यात येत आहे व देशातील जनतेची मूळ प्रश्नांपासून दिशाभूल करून संविधान संपविण्याचा प्रयत्न भाजप सरकार नेते आणि पदाधिकारी करीत आहे. असा आरोप गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांनी यावेळी केले. मात्र संविधानाच्या रक्षणाकरिता आणि देशाच्या हिताकरिता काँग्रेस पक्ष आणि आणि आम्ही सदैव रस्त्यावर उतरत राहणार असल्याचेही रजनीकांत मोटघरे यांनी सांगितले. आंदोलनात प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव किरसान, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस जिल्हाअध्यक्ष रजनीकांत मोटघरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्वजीत कोवासे, तालूकाध्यक्ष वसंता राऊत, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती महिला शहराध्यक्ष वर्षा गुलदेवकर, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, अब्दुल पंजवानी, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले युवक काँग्रेस सचिव नितेश राठोड, महीपाल उंदीरवाडे, पौर्णिमा भडके यावेळी उपस्थित होते.