
Circuit house-complex-Gadchiroli: शेतकरी कामगार पक्ष समीतीच्या केंद्रीय सभेच्या शेकापच्या मध्यवर्ती निमित्याने दोन दिवशीय जिल्हा दौऱ्यानिमित्त MLA Jaynt patil आ. जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या अंतर्गत सर्किट हाऊस येथे आयोजित. Press conference circuit house complex Gadchiroli पत्रकार परिषदेतून ते बोलत होते. यावेळी शेकापचे मार्गदर्शक प्रा. एस. जाधव, अँड राजेंद्र कोरडे, रामदास जराते, जयश्री वेळदा, गुरवळाच्या सरपंचा दर्शना भोपये, तुकाराम गेडाम, अक्षय कोसनकर, श्यामसुंदर ऊराेड,सदस्या कविता ठाकरे व शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेस संबोधीत करताना आ. जयंत पाटील यांनी २७ नोव्हेंबरला इंदिरा गांधी चौकात निर्धार सभा असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पेसा कायदा अबाधित राहावा याकरिता पक्षाची भूमिका असून पेसा कायद्यावर आक्रमण झाल्यास आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामसभेचे अधिकार डावलून जिल्ह्यातील वनसंपदा नष्ट केली जात आहे, आदिवासींचे पारंपारिक , व्यवसाय नष्ट करण्याचे काम खनिज उत्खननातून सुरू आहे. याकडे शासन, प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्याकरीता जिल्ह्यातील जनतेने आंदोलने उभे करावीत. शेकाप ताकदीने नागरिकांच्या अंशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करणार तसेच जिल्ह्यातील विविध प्रलंबित मुद्दे, शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, आदिवासी, मच्छिमार यांना हक्क व न्याय मिळवून देण्याकरिता डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात पाउस खुप मोठ्या प्रमाणात आल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याकरिता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. ज्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांचा समावेश नुकसानभरपाईच्या यादीमध्ये व्हावा असेही ते म्हणाले. आज खऱ्या अर्थाने सरकार अस्तित्वात नसल्याची खंत व्यक्त करीत एकाच मंत्र्याकडे पाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणे हे ऐतिहासिक असून लोकांना खरा न्याय मिळेल काय असा प्रश्न पत्रकार परिषदेत त्यांनी उपस्थित केला. तालुक्यातील काटली शाळेला विकास कामाकरिता एक लाख रूपये निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. एअर होस्टेस साठी जिल्ह्यातील मुलींना विशेष कोटा असावा, देशाच्या विकासात शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची असून शेतकरी हा विकासाचा कणा असल्याचे त्यांनी सांगितले.
