गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजना

56

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजना

 

गडचिरोली,Gadchiroli दि.18: गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप करणे योजनेअंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल व रु.500/- इतके अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा व गटई कामगार असावा. अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु.40,000/- व शहरी भागात रु. 50,000/- पेक्षा अधिक नसावे. (यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.). अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड (कॅन्टोन्मेंट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वत:च्या मालकीची असावी. अधिक माहितीकरीता व अर्जाकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, गडचिरोली कार्यालयाशी संपर्क करण्यात यावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here