खासदार अशोक नेते यांनी जख्मी ला पोहचविले रुग्णालयात

67

मा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी दाखवीली माणुसकी

गडचिरोली(Gadchiroli):-मा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी सावली च्या दौरा प्रसंगी दिवाळी आनंद शिधा वाटपाचे,व सांत्वन भेटि दरम्यान गडचिरोली कडे जात असतांना नवेगांव (मुरखळा) जवळ एका अज्ञात ट्रक वाहन चालकाने मोटारसायकल स्वारास धडक दिली.या धडकेत मोटारसायकल स्वार गंभीररित्या जखमी झालं.रस्त्यांच्या बाजुला अचानकपणे खासदार नेते साहेब यांचे लक्ष गेले असता डायव्हर ला गाडी थांबण्याच्या सुचना केल्या व गाडीच्या खाली उतरले व घटनेची पाहणी केली.धडक दिलेला मोटारसायकल स्वारास डोक्याला मार लागुन रक्त जात असल्याने गंभीररित्या जखमी झालेला बघुन तात्काळ गंभीर झालेल्या व्यक्तिस खासदार साहेब यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये उचलून त्या व्यक्तिस सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे स्वतः जाऊन भरती करण्यात आले.लगेच खासदार नेते साहेब यांनी डॉ.अनिल रूडे जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करून गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तिस तुरंत उपचारासाठी सुचना केल्या. तसेच वार्डामधील रुग्णांची विचारपूस सुद्धा या प्रसंगी करण्यात आली.

जखमी झालेला मोटारसायकल स्वार हा व्यक्ती विजय म्हशाखेत्री वय ४५ वर्ष असुन राहणार- मोखाळा, तालुका – सावली जिल्हा – चंद्रपूर येथील व्यक्ती आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मनीप्रमाणे माणूस द्या, मज माणूस द्या, माणसाने माणुसकीचा जीवन जगला पाहिजे, अशी शिकवण देऊन या प्रसंगावरून खासदार अशोकजी नेते यांनी माणुसकी दाखवली असे निदर्शनास येते.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा चे अविनाश पाल,कीर्ती मासुरकर, नवेगांव येथील अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here