
खरपुंडी येथे जाऊन खासदार अशोकजी नेते यांच्याकडून आर्थिक मदत व सांत्वना भेट

दिं. ०५ मार्च २०२३
Kharpundi- Gadchiroli गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील खरपुंडी येथील भाजपाचे बुथ प्रमुख स्व.सौरभ एकनाथ भांडेकर वय २८ वर्ष हया इसमाचे हृदयविकाराचा अचानक झटका आल्याने मृत्यू झाले.त्यांचे मृत्यू झाल्याची माहिती भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख रमेश नैताम यांनी खासदार अशोकजी नेते यांना दिली असता या संबंधित तात्काळ दखल घेत मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना खासदार अशोकजी नेते यांनी आज दिं ०५ मार्च २०२३ ला खरपुंडी येथे खासदार अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा अशोकजी नेते,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश जी गेडाम,
शक्ती केंद्रप्रमुख रमेश नैताम, रवींद्र भांडेकर, एकनाथ भांडेकर, संजू भांडेकर, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.