कॉलेजमध्ये जात असतांना रस्त्यात अडवुन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोन्ही आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास

197

कॉलेजमध्ये जात असतांना रस्त्यात अडवुन तरुणीवर बलात्कार करणा­या दोन्ही आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास व एकुण 2,74,000/- हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली

Accused of raping young girl sentenced to 10 years rigorous imprisonment

* मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय

 

गडचिरोली:- सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन कुरखेडा येथे दिनांक 07/03/2018 रोजी फिर्यादी (पीडीता) मुलगी वय 23 वर्षे हीने फिर्याद दिली की, ती दि. 03/03/2018 रोजी मौजा बेलगाव (स्वगाव) वरुन सकाळी 11.00 वा. नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये कुरखेडा येथे सायकलने जात असतांना बेलगाव ते नवरगाव रोडवर आरोपी नामे 1) प्रशांत उमाजी जोगे, वय 32 वर्षे 2) रविंद्र सुमराज मडावी, वय 25 वर्षे यांनी पिडीतेचा पाठलाग करुन पिडीतेला रस्त्यात अडवुन, दोघांनी सायकलवरुन खाली पाडले व तिला एकाने तोंडावर रुमाल बांधुन, पिडीताचे तोंड दाबुन दुस­या आरोपीने तिला उचलुन नेऊन, त्यांच्या जवळ असलेल्या दुचाकी वाहनावर बसवुन, बेलगाव ते मालदुगी या जंगल भागात कच्या रस्त्याने घेऊन गेले व 50 मिटर रोड पासुन जंगल भागात दुपारी 12.00 ते 12.30 वा. च्या सुमारास दोन्ही आरोपीने पिडीतेवर अतिप्रसंग करु लागले. तेव्हा पिडीताने प्रतिकार केला असता, आरोपी नामे रविंद्र सुमराज मडावी याने पिडीतेला दोन्ही हाताने पकडुन प्रशात जोगे याने पिडीतेला टोकदार वस्तुने टोचुन जखमी केले व तिचे सोबत प्रशांत जोगे व रविंद्र मडावी याने जबरदस्तीने शारिरीक संबंध करुन पिडीतेला हाताबुक्याने जोरदार मारहाण केली व तु जर आपल्या आई वडीलांना सांगितली, तर तुला व तुझ्या आई वडीलांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. दोन्ही आरोपीने तिचे कपडे फाडत असतांना त्याचवेळी पिडीता ही त्याचे तावडीतुन सुटून रस्त्यावर येऊन एका अनोळखी मुलीच्या सहाय्याने आपले घरी पोहचुन आई वडीलांना हकिकत सांगितली.

 

अशा फिर्यादीच्या (पिडीता) तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे कुरखेडा दि. 07/03/2018 ला अप. क्र. 035/2018 अन्वये कलम 342, 354 (ड), 366, 376 (1), 323, 506, 34 भादवी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस दिनांक 08/03/2018 रोजी अटक करुन, तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 55/2018 नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्य धरुन दिनांक 17/05/2024 रोजी आरोपी 1) प्रशांत उमाजी जोगे, वय 32 वर्षे, 2) रविंद्र सुमराज मडावी, वय 25 वर्षे दोघेही रा. तळेगाव, तह. कुरखेडा, जि. गडचिरोली यांना मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांनी आरोपीस प्रत्येकी कलम 342 मध्ये 1 वर्ष व 1000/- रुपये, 354(ड) मध्ये 03 वर्ष व 10,000/- रु, 366 मध्ये 10 वर्ष व 50,000/- रु, 376 (1) मध्ये 10 वर्ष व 50,000/- रु, 323 मध्ये 1 वर्ष व 1000/- रु., 506 (2) मध्ये 5 वर्ष 25,000/- रु. मध्ये दोषी ठरवुन वरील प्रमाणे सश्रम कारावास व एकुण 2,74,000/- हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला. आरोपींनी सर्व शिक्षा ह्या एकत्रितपणे भोगण्याचा आदेश केला.

 

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्याचा तपास सहा. पोनि. गजानन ज्ञानदेव पडळकर व पोउपनि. विजय वनकर, पोस्टे कुरखेडा यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here