केद्रींय गृहमंत्री अमीत शहा यांची घेतली खासदार अशोक नेते यांनी भेट

150

केंद्रीय गृहमंत्री मान.अमितजी शहा यांच्याशी नई दिल्ली येथे भेटी दरम्यान खासदार श्री. अशोकजी नेते यांनी गडचिरोली जिल्हातील विविध क्षेत्रांतील विकासात्मक समस्याबाबत चर्चा करून निवेदन सादर केले

दिं.२५ जुलै २०२३

गडचिरोली  नई दिल्ली: -गडचिरोली जिल्ह्य हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त अविकसित आकांशीत जिल्हा, म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात हिरा,पन्ना, सोना, मॅग्नेट,लोहा मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे.त्याचबरोबर मोठ मोठे उद्योगधंदे, कारखाने, नाहित,उद्योग विरहित जिल्हा आहे. जिल्ह्याचा सार्वभौम भौगोलिक विकास नसल्याने मोठ्या प्रमाणे बेरोजगारी सुद्धा आहे.

 

गडचिरोली जिल्हा जंगलाने मोठ्या प्रमाणात व्यापलेला असल्यामुळे येतील रस्ते,रोड लाईन, रेल्वे या संबंधित अनेक समस्या येत असतात,गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्षलग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये भौगोलिक सोयी सुविधा चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात निधि उपलब्ध करावा.जेणेकरून या क्षेत्राचं नक्की यांचा फायदा होईल. असा विशवास खासदार अशोकजी नेते यांनी व्यक्त करत त्याचप्रमाणे जिल्हातील रेल्वे लाईन ही वडसा (देसाईगंज) येथे एकमेव असुन वडसा (देसाईगंज) गडचिरोली हा रेल्वे मार्ग (₹:३२२) तिनशे बाविस कोटी चा सर्वे टेंडर झालेला आहे.लवकरच या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार तसेच या रेल्वे मार्गाच्या उदघाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा गडचिरोली ला येणार याबरोबरच गडचिरोली जिल्हातील वैनगंगा नदिच्या तिरावर एकुण पाच बँरेजेस मंजूर झाले आहेत. त्यापैकी चिचडोह यांचे काम पुर्ण झाले असुन कोटगल बँरेजेसचे काम चालू आहे.तिन बँरेजेसचे काम लवकरच चालू होणार,कोनसरी प्रोजेक्ट व बँरेजेसच्या हया हि उदघाटनाला यावे.यासंबंधित खासदार अशोकजी नेते यांनी येण्याची विनंती केली आहे.

 

गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रांतील तसेच गडचिरोली जिल्हाच्या विविध क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री मान.अमितजी शहा याच्याशी भेटी दरम्यान खासदार अशोकजी नेते यांनी चर्चा करून निवेदन सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here