किमान प्रायोगिक तत्त्वावर तरी सेंद्रिय शेती करा आमदार MLA Dr.Devrao holi डॉक्टर देवरावजी होळी

71

किमान प्रायोगिक तत्त्वावर तरी सेंद्रिय शेती करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

सेंद्रिय शेती उपयुक्त साहित्य व जनजागृती, प्रात्यक्षिक केंद्राचे आमदार mla dr.devrao holi  डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन

यातून सेंद्रिय शेतीस उपयुक्त गांडूळ खत व दर्शपणी अर्क मिळणार

Pendhri-Dhanora Gadchiroli :-आज सेंद्रिय शेतीतून उत्पादित वस्तूंना प्रचंड मागणी असून या शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील काही भागात किमान प्रायोगिक तत्त्वावर तरी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पेंढरी येथे सेंद्रिय शेती उपयुक्त साहित्याच्या दुकानाचे व जनजागृती केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले. याप्रसंगी पेंढरीचे सरपंच श्री पवनजी येरमे, मार्गदर्शन केंद्राच्या सौ भाग्यश्री चौधरी, चंद्रकला सोनुले, सिंधू गावतुरे ,शुभांगी लेनगुरे, यांचेसह प्रमुख महिला पदाधिकारी व उमेदचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य ग्रामीण राष्ट्रीय जीवन्नोती अभियान (उमेद) अंतर्गत राष्ट्रीय आर्थिक ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ,तालुका व्यवस्थापन अभियान कक्ष धानोरा च्या वतीने यशस्वी एलजी ग्रुपच्या माध्यमातून पेंढरी येथे सेंद्रिय शेती उपयुक्त साहित्याच्या दुकानाचे व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आमदार डॉ देवराव जी होळी यांचे हस्ते करण्यात आले आजच्या काळात सेंद्रिय शेतीला फार महत्त्व आहे. यातून शेतकरी मोठा आर्थिक लाभ मिळवत आहे. आपल्या आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीतील काही भाग सेंद्रिय शेतीसाठी राखीव ठेवून त्यातून सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दुकानातील सेंद्रिय खत खरेदी करून या खरेदी केंद्राचे रीतसर उद्घाटन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here