कारगिल शहीद स्मारक गडचिरोली येथे माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

67

कारगिल शहीद स्मारक गडचिरोली येथे माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Flag Hoisting at Kargil Martyr Memorial Gadchiroli by Former Mayor Yogitatai Pipre

santoshbharatnews gadchiroli

गडचिरोली :- दि 26 जाने चंद्रपूर मार्गावरील आठवडी बाजारालगत प्रभाग क्र 11 मधील भाजप बुथ क्रमांक 100 व 101 येथे असलेल्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या कारगिल शहीद स्मारका समोर आज दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, कारगिल शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष उदयजी धकाते, व्हिजन मार्केटिंग चे संचालक सुनील देशमुख, माजी नप सभापती मुक्तेश्वर काटवे माजी नप सभापती केशव निंबोड, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर अर्चना निंबोड, कोमल बारसाकडे पुनम हेमके, विलास नैताम, देवाजी लाटकर तसेच कारगिल शहीद स्मारक समितीचे सदस्य व प्रभाग क्र 11 मधील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here