एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गडचिरोली पोलीस दलाने केला क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस

197

एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गडचिरोली पोलीस दलाने केला क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस

 

Korchi – पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत दिनांक ०८/०१/२०२३ रोजी मौजा देवसुन कटेझरी जाणाऱ्या रोडवर सुमारे ५५ किलोमीटर पूर्व दिशेला एक अनोळखी मृतदेह मिळुन आला होता. त्यास ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे उपचारकामी दाखल केले असता, मा. वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून त्यास मृत घोषीत केल्याने, पोस्टे कोरची येथे मर्ग क्र. ०३ / २०२३ दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोउपनि नरेश वाडेवाले करीत होते. सदरचा मृतदेह हा मृतक नामे मेहतर कुवरसिंग कचलाम, वय ५५ वर्षे, रा. पौरखेडा, तह. दुर्गकोंदल, जि. कांकेर (छत्तीसगड) याचे असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. परंतू या मर्गबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांना शंका असल्याने त्यांनी मर्गबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांना दिले. यावरुन एक महीण्याच्या अथक परिश्रमानंतर सखोल चौकशीअंती हा मर्ग नसुन, खून असल्याचे उघडकीस आल्याने संशयीत आरोपी नामे १) मुकेश बुधरुराम यादव, वय ३६ वर्षे, व्यवसाय – फॉरेस्ट गार्ड, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर-मोहला-चौकी (छत्तीसगड), २) सौरभ राजेंद्र नागवंशी, वय २७ वर्षे, व्यवसाय चालक, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला चौकी (छत्तीसगड), ३) रुपसिंग – बाबुराव तुलावी, वय २७ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला चौकी (छत्तीसगड), ४) आसुराम देवजी तुलावी, वय ३६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. मानपूर – मोहला-चौकी (छत्तीसगड) यांनी संगनमत करुन कट रचुन मृतक मेहतर कुवरसिंग कचलाम यास पैसे परत न केल्याच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने चारचाकी वाहनाने पळवून नेवुन त्यास मारहाण करुन जिवानीशी ठार केले तसेच मृतकाची मोटरसायकल हिचे चेसीस नंबर घासुन पुरावा नष्ट करुन घटनास्थळावर आणून टाकल्याचे सांगीतले. त्यावरुन गडचिरोली पोलीस दलाने वरील आरोपीतांवर पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. १३/२०२३, कलम ३०२, ३६४, १२० (ब), २०१, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असुन, त्यांना अटक करण्यात आली व सदर अटक आरोपीतांना मा. न्यायालयापुढे हजर केले असता, मा. न्यायालयाने चारही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

 

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा, श्री. साहील झरकर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here