
*एकनिष्ठ प्रेम*

सखे,तुझ्यावर प्रेम केलं
नेहमीच करत राहणार
तुझ्यासाठी जगणार अन्
तुझ्यासाठीच मरणार ll१ll
तू माझ्या आयुष्यात आली
तेव्हापासून छान वाटतो मला
तुझ्यासाठी काही पण करेन
सांग फक्त काय हवं तुला ll२ll
एकनिष्ठ प्रेम आपला
किती हवाहवासा वाटतो
आपला प्रेम किती आहे
एकमेकांच्या मनाला कळतो ll३ll
कधी रागावतो तुझ्यावर
पण तो राग खरं नसतो
तुझ्यासोबत बोलण्याचा तो
माझा एक बहाणाचं असतो ll४ll
तूझ्या सोबत बोलताना
मी सारं विसरून जातो
दिवसभर तुझीच तर
आठवण करत राहतो ll५ll
सखे,तुझाच विचार मी
करत असतो दिवसभर
माझा प्रेम राहील
तुझ्यावरच आयुष्यभर ll६ll
✍🏻अजय द. राऊत