
आमदार डॉ. देवरावजी होळी हे विकासाची दृष्टी असणारे नेते भाजपा नेते प्रमोद पिपरे

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त लांझेडा येथील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
त्यांच्या नेतृत्वात गडचिरोली विधानसभा मध्ये प्रचंड विकासाची कामे झाल्याचा केला उल्लेख
उद्योग निर्मितीसाठी व सर्वसामान्य लोकांना रोजगार देण्यासाठी त्यांचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद
वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे तडफदार लोकप्रिय आमदार डॉक्टर देवराव जी होळी हे विकासाची दृष्टी असणारे नेते असून त्यांच्या कार्यकाळामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रात प्रचंड विकास कामे झाल्याचा उल्लेख गडचिरोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रमोद जी पिपरे यांनी निवासी अपंग शाळा लांझेडा येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप कार्यक्रमात केले. यावेळी शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ योगिताताई पिपरे , माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुका संपर्कप्रमुख विलासजी भांडेकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे , माजी नगरसेविका सौ वैष्णवी ताई नैताम, लताताई लाटकर, निमाताई उंदीरवाडे, वर्षाताई शडमाके ,अलकाताई पोहनकर, तालुक्याचे नेते बंडूभाऊ झाडे,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर कुंभरे ,महामंत्री हर्षल गेडाम, शहराचे महामंत्री विनोद देवोजवार, भाजपा पदाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष सोमेश्वरजी धकाते, निखिल चरडे, विवेक बैस, कोमलताई बारसागडे , रश्मीताई बघमारे, सेवानिवृत्त प्राध्यापक उराडे सर, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व शाळेतील प्राचार्य शिक्षक यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शहरात फिरणाऱ्या मनोरुग्ण तथा निराधार यांना ब्लॅंकेट चे वाटप, महिला व बाल रुग्णालयात फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रमानंतर लांझेडा निवासी अपंग शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमोदजी म्हणाले की आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात उद्योग क्रांती काढून जिल्ह्यामध्ये उद्योगाबद्दल नवचैतन्य निर्माण केले. अनेक नव उद्योजक यामुळे पुढे आले. अगरबत्ती क्लस्टर महिलांसाठी रोजगार देणारा क्लस्टर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाला. गडचिरोली जिल्ह्यात कोटगल बॅरेजचा प्रश्न निकाली लागला. येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळावी यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढला. जिल्ह्यातील मोठमोठे प्रश्न त्यांच्या या कार्यकाळात मार्गी लागत असून त्यांची विकास कामे अतिशय दिसून येणारी आहेत.