आनंद असतो तरी काय ?

97

आनंद असतो तरी काय ?

 

काय असतो आनंद?

कुठे असतो आनंद?

आनंद आनंद गडे

जिकडे तिकडे चोहिकडे!..

 

दडून बसतो हृदयात

पकडून ठेवतो हातात

जो आनंद असतो गगनात!..

 

आनंदाचं भान जागृत

आनंदाचं रहस्य अमृत

आनंदाचा अनुभव प्रकृत

जो आनंद असतो सुकृत!..

 

जीवनाच्या गप्पागोष्टी

आयुष्याच्या अस्तित्वातही

जिवाभावाची ओळख

ही असते आनंदाची पारख!..

 

आनंद आनंद असतो तरी काय ?

आनंदाची गंमत अशी

शोधू लागला की सापडत नाही

सापडला तर दिसत नाही!..

 

आनंदासाठी आटापिटा करतो

तेवढ्या तो हुलकावण्या देतो

जो आनंद असतो

इकडे तिकडे चोहिकडे!..

 

प्रिती गाढवे

नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here