
santoshbharatnews Gadchiroli :

Immediate action should be taken against the team manager and coach who misbehaved with the girls’ team of inter-varsity ball badminton players in Chennai.
आंतर विद्यापीठ बॉलबॅडमींटन खेळाडू मुलींच्या संघासोबत चेन्नईत झालेल्या गैरवर्तनुक करणाऱ्या संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक याच्यावर तात्काळ कारवाई करावी.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची मागणी खेळाडू विद्यार्थीनी सोबत जाऊन गोंडवाना विद्यापीठ प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे याना निवेदन देऊन जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केली मागणी
आंतर विद्यापीठ बॉलबॅडमींटन स्पर्धा अब्दुल रहमान विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र चेन्न्ई येथे झालेल्या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत् बॉलबॅडमींटन खेळाडू मुलींचा संघ सहभागी झाला होता. ही स्पर्धा दिनांक २७ ते ३० जानेवारी २०२३ रोजी आयोजीत केली होती. या स्पर्धेकरीता खेळाडू मुलींचे संघ २५ जानेवारीला चंद्रपूर रेल्वेस्थानकावरुन चेन्नईच्या दिशेने रवाना झाला. मुलींच्या संघाकरीता प्रशिक्षक व संघसंचालक म्हणून महीला प्रशिक्षक व संचालकांना पाठविणे गरजेचे असताना सुध्दा विद्यापीठाने संघ संचालक विजय सोनकुवर व प्रशिक्षक राकेश हजारे यांना जबाबदारी पूर्व खेळाडू संघासोबत पाठविले होते. परंतु चेन्नई येथे संचालक विजय सोनकुवर व प्रशिक्षक राकेश हजारे यांनी पहील्या दिवशी पासून दारुच्या मद्यधुंद अवस्थेत राहून खेळाडू विद्यार्थीनींना त्रास देण्याचा काम केले. याशिवाय मुंबई व अमरावती विद्यापीठातील खेळाडू विद्यार्थीनींना त्यांच्या रुममध्ये जाऊन मोबाईल चार्जींग करायचा आहे तुम्ही गोंदीयाचे खेळाडू आहेत का अशा प्रकारचा विचारणा करुन त्यांना दारुच्या नशेत त्रास देण्याचा काम केला. गोंडवाना विद्यापीठ बॉलबॅडमींटन खेळाडू सहभागी विद्यार्थीनी बरखा यादव, रानी गोंड, ज्ञानेश्री गोन्नाडे, साक्षी उमाटे, पूजा नैताम, वैभवी धोडरे, श्रुती धोटे , श्रुतिका येटे, श्रुती घूबडे, रोहिणी गुज्जनवार यांनी चेन्नई येथे झालेल्या अब्दुल रहमान विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ चेन्नई येथे सहभागी झाले होते. खेळाडू विद्यार्थीनींना संघ संचालकांनी प्रवासभत्ता व विशेष भत्ता देण्यात आलेला नाही. प्रवास करतांना रेल्वेमध्ये खेळाडू विद्यार्थीनींची गैरसोय झाली. गैरसोयी संदर्भात संचालकांना सांगितले असता त्यांनी उलट उत्तर देत तुम्ही तुमचा बघुन घ्या कींवा स्वच्छता गृहात जाऊन बसा मला काही देणंघेणं नाही असे उत्तर दिले. झालेला प्रकार ३० जानेवारीला सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे परत येऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांना सांगितला. झालेल्या प्रकाराची विद्यार्थीनींकडून माहीती घेत असतांना खेळाडू विद्यार्थीनींना संघ संचालक विजय सोनकुवर यांनी तुम्ही जर माझी तक्रार केली तर पुढील वर्षात होणाऱ्या आंतर विद्यापीठ बॉलबॅडमींटन खेळाडू संघात तुम्हाला सहभागी होवू देणार नाही तसेच झालेल्या प्रकरणाची तक्रार माझ्या समक्ष विद्यापीठ क्रीडा संचालकांना करा अशी विनंती करीत होता परंतु खेळाडू विद्यार्थीनींनी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्र. कुलगुरु यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे संघ संचालक विजय सोनकुवर व प्रशिक्षक राकेश हजारे यांच्यावर योग्य ती कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करुन चौकशी समिती मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. जर कारवाई झाली नाही तर विद्यापीठ परीसरात आंदोलन करण्यात येईल व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फतीने सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम व तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वात विद्यापीठ अधीसभेत मुद्दा लावून धरण्यात येईल व कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल. संघ संचालक विजय सोनकुवर यांना तात्काळ निलंबित करुन तसेच प्रशिक्षक राकेश हजारे यांच्यावर फौजदारी कारवाई करुन त्यांना खेळाडू संघा सोबत जाण्यास बंदी घालावी. सदर निवेदन प्र. कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे व विद्यापीठ क्रीडा संचालक प्राध्यापक अनिता लोखंडे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले. सोबत युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, कार्याध्यक्ष चेतन गद्देवार, पायल सहारे, अश्विनी गोवर्धन, बॉलबॅडमींटन खेळाडू विद्यार्थीनी बरखा यादव, रानी गोंड, ज्ञानेश्री गोन्नाडे, साक्षी उमाटे, पूजा नैताम, वैभवी धोडरे, श्रुती धोटे , श्रुतिका येटे, श्रुती घूबडे, रोहिणी गुज्जनवार, उमंग चौधरी, सुमीत अलाम, वैकंटेश भोयर, सौरभ रामटेके, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, रीतीक डोंगरे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.