आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य महोत्सव 2022 करीता तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण ; प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

76

आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य मध्ये तरुणाईची धम्माल

 

आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य महोत्सव 2022 करीता तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण ; प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

 

 

गडचिरोली(गो वि),दि१३:

आंतर महाविद्यालयीन तिन दिवसीय इंद्रधनुष्य महोत्सावाचा समारोप स्थानिक सुमानंद सभागृह इथे नुकताच पार पडला.

 

रांगोळी, स्थळ चित्र ,वादविवाद स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा ,प्रश्नमंजुषा मूक नाट्य, नकला, एकांकिका, प्रहसन, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, समूह गान ,पोस्टर मेकिंग, व्यंगचित्र ,चिकट कला ,माती कला,शास्त्रीयनृत्य,लोकनृत्य,

आदी कलाप्रकार सादर करण्यात आले. या कलाप्रकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला. लोकनृत्यात तर तरुणाई अक्षरशः थिरक्तांना दिसली.

 

समारोपाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, वित्त व लेखा अधिकारी साकेत दशपुत्र ,माजी सिनेट सदस्य डॉ. संध्या येलेकर, सदस्य विद्यार्थी विकास विना जंबेवार आणि या कार्यक्रमाचे आयोजक संचालक विद्यार्थी विकास डॉ.शैलेंद्र देव, आदींची उपस्थिती होती.

 

अध्यक्ष स्थानावरून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले,निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाद्वारे तज्ञ प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण देण्यात येईल व त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठात राज्यस्तरीय इंद्रधनुष्य 2022 करता पाठवण्यात येईल.

 

यावेळी अनिकेत दुर्गे सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, सविता टेकाम खत्री कॉलेज चंद्रपूर, प्रा.डॉ.वासेकर राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली, डॉ. विणा जांबेवार जे.एस.पी.एम महाविद्यालय धानोरा यांनी मनोगत व्यक्त केले.

 

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २४कला प्रकारातील एकूण ७२ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.परीक्षक म्हणून विविध कला प्रकारातील तज्ञ मंडळींनी परीक्षण केले. यात नाटक ,प्रहसन कला प्रकारात निशा धोंगडे, जगदीश नंदुरकर ,राजेश सोयाम,

ललित कला डॉ. संध्या येलेकर मनोज इरदे,विशाल बैसारे शास्त्रीय नृत्यात डॉ. एकता कुरेकर ,मृणालीनी खाडिलकर, वकृत्व, वादविवाद स्पर्धेत प्रा. स्वरूप तारगे, प्रा. ढोले, नकला आणि लोकनाट्य दादाजी चुधरी, यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे अहवाल वाचन डॉ. शैलेंद्र देव ,आभार डॉ.रूपाली अलोणे आणि संचालन डॉ. शिल्पा आठवले यांनी केले. या महोत्सवाच्या यशस्वी ते करिता डॉ. प्रिया गेडाम ,डॉ.प्रीती काळे,डॉ. प्रफुल्ल नांदे, डॉ. सविता गोविंदवार, डॉ. प्रशांत सोनवणे ,गौरी ठाकरे, प्राचीन घडसे, डॉ. रजनी वाढई आणि इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

 

 

स्पर्धेतील विजेते स्पर्धक

 

रांगोळी स्पर्धेत तिसरा क्रमांक सिंध्दी गजानन पिंजरकर ,हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी पडोली ,दुसऱा क्रमांक आकांक्षा रमेश पाकमोडे, यादवराव पोशटीवार महाविद्यालय तळोधी , प्रथम क्रमांक संजीवनी मिलिंद शिंल्ये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर,

 

स्थळ छायाचित्रण स्पर्धेत तिसरा क्रमांक खिनेश ईश्वर गोवर्धन राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली, दुसरा क्रमांक संजय सरपे, पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्रथम क्रमांक प्रणय रामनाथ वाढी सरदार पटेल महाविद्याल, चंद्रपूर

 

स्थळ चित्र स्पर्धेत तिसरा क्रमांक शुभम शंकर अधिकारी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, दुसरा क्रमांक पायाल मंगेश भर्रे शांताबाई भैय्या महिला महाविद्यालय ब्राह्मपुरी, प्रथम क्रमांक अभिषेक भिमराव साखरे राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली.

 

वादविवाद स्पर्धेत

तिसरा क्रमांक सिद्धार्थ राहुल चव्हाण डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर, दुसरा क्रमांक प्रलय शाम मशाखेत्री सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, प्रथम क्रमांक अनिकेत नियेश्वर दुर्गे सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर,

 

वकृत्व स्पर्धेत तिसरा क्रमांक प्रलय शाम म्हशाखेत्री, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, दुसरा क्रमांक अरबाज मुस्तफा शेख केवळरामजी हरडे महाविद्यालय,चामोर्शी , प्रथम क्रमांक अनिकेत नामेश्वर दुर्गे सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर , प्रश्नमंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर, दुसरा क्रमांक चिंतामणी कला व विज्ञान महाविद्यालय, गोंडपिपरी , प्रथम क्रमांक सरकार पटेल महाविद्यालय चंद्रपूर ,

 

लोकनाट्य तिसरा क्रमांक ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, दुसरा क्रमांक कला वाणिज्य महाविद्यालय भिसी, प्रथम क्रमांक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली

 

नकला कला प्रकारात सचिन उमेश राऊत प्रथम क्रमांक

 

एकांकिका स्पर्धेत तिसरा क्रमांक गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रह्मपुरी ,दुसरा क्रमांक ग्रामगीता महाविद्यालय चिमुर, प्रथम क्रमांक कला वाणिज्य महाविद्यालय भिसी

 

प्रहसन स्पर्धेत तिसरा क्रमांक ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, दुसरा क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय चिमुर,

प्रथम क्रमांक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली,

 

शास्त्रीय संगीत तृतीया क्रमांक प्रांजली विश्वास निळकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्‍वर दोनाडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी ,प्रथम क्रमांक मीनाती यादव एफ.ई.एस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर

 

सुगम संगीतात तृतीय क्रमांक सपना राऊत संत के. इ. चावरा बी.एड. कॉलेज बामणी, बल्लारपूर ,द्वितीय क्रमांक साक्षी कौरासे ग्रामगीता महाविद्यालय चिमूर ,हर्षल घोसे नवजीवन महाविद्यालय ब्रह्मपुरी ,प्रथम क्रमांक मीनाली यादव,एफ.ई.एस . गर्ल्स कॉलेज चंद्रपूर

 

समूह गीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक चिंतामणी महाविद्यालय पोभुर्णा, तुत्तीय क्रमांक नेवजाबाई हीतकरणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, प्रथम क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

 

शास्त्र ताल वाद्य संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक निलेश वासनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हगिरी ,द्वितीय क्रमांक संतोष जवजांळकर, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर प्रथम क्रमांक अजित कुकडकर नसरुद्दीन भाई पंजवाणी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी

 

शास्त्रीय ताण वाद्य संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक संतोषी बल्लूरबार राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली

द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर दोनाडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी, प्रथम क्रमांक मिताली यादव एफ एस गर्ल्स महाविद्यालय चंद्रपूर

 

पाश्चिमात्य गायन सानिका सातव राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय नागभीड

द्वितीय क्रमांक रोहिणी शेरकी, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली, प्रथम क्रमांक गायत्री जाधव सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

 

पार्श्वगायन समूह गीत द्वितीय क्रमांक ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, प्रथम क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर,

पोस्टर मेकिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक सायली राजू कुकडे सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, दुसरा क्रमांक आर्यन ताराचंद्र उराडे चिंतामणी कला विज्ञान महाविद्यालय गोंडपिपरी, प्रथम क्रमांक अभिषेक भीमराव साखरे राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली

 

व्यंगचित्र दुसरा क्रमांक आकाश मनोज मडावी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर ,प्रथम क्रमांक हर्षल सुनील घोषे नेवजाबाई हितकरणी महाविद्यालय ब्रह्मपुरी,

 

चिकटकला स्पर्धेत तिसरा क्रमांक सारिका संजय गुगल सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, दुसऱ्या क्रमांकावर रोहिणी किशोर गुंजनवार चिंतामणी महाविद्यालय पोभुर्णा, प्रथम क्रमांक स्नेहा गुलाब कुमरे जे. एस .पी. एम .महाविद्यालय धानोरा .

 

मातिकला स्पर्धेत तिसरा क्रमांक हर्षल सुनील घोषे नेवजाबाई हितकरणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, दुसऱ्या क्रमांक भावेश नरेश जाधव सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर ,प्रथम क्रमांक अक्षय अंबादास गोबाळे गोविंद प्रभू कला वाणिज्य महाविद्यालय तळोधी

 

शास्त्रीय नृत्यात दुसरा क्रमांक सुरज जिवतोडे, निळकंठराव शिंदे कला विज्ञान महाविद्यालय भद्रावती ,प्रथम क्रमांक सायली कावळे चिंतामणी कला विज्ञान महाविद्यालय,गोंडपिपरी

 

लोकनृत्य तिसरा क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, दुसरा क्रमांक नेवजाबाई हितकरणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, प्रथम क्रमांक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here